धक्कादायक! भीषण अपघातात ‘या’ मंत्र्याचा मृत्यू 

Sri Lanka State Minister Accident Death : श्रीलंकेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भीषण अपघातात देशाचे जल संसाधन राज्यमंत्री सनथ निशांत यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि चालक यांचाही मृत्यू झाला आहे. स्थानिक माध्यमांनी याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काटुनायके हायवेवर हा अपघात झाला. सनथ यांची गाडी एका कंटेनरला धडकून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ते काटुनायके गावातून कोलंबोकडे जात होते. गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर तातडीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र उपचारांदरम्यान सनथ यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हा अपघात एवढा भीषण होता, की मंत्र्यांच्या गाडीचा अगदी चुराडा झाला होता. आतील जखमींना बाहेर काढण्यासाठी देखील भरपूर प्रयत्न करावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Comment