विधान परिषदेवर संधी न मिळाल्यास राज्यसभेवर जाणार का? बाळासाहेब थोरात म्हणाले….

नाशिक – विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीची एक जागा निवडून येणार असून, या जागेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यास ते आघाडीचे सर्वसंमतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीवर भाष्य केले.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, जर उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नसतील, तर काँग्रेस या जागेवर आपला उमेदवार निश्चितपणे उभा करेल. यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाशी चर्चा केली जाईल. काँग्रेसमध्ये या जागेसाठी अनेक जण इच्छुक असून, पक्ष तरुण नेतृत्वाला संधी देण्याबाबत विचार करत आहे.

विधान परिषदेवर संधी न मिळाल्यास राज्यसभेवर जाणार का? या प्रश्नावर थोरात यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. “मी राजकारणी आहे आणि राजकारणात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते,” असे सांगत त्यांनी भविष्यातील संधींबाबतचे पर्याय खुले असल्याचे सुचित केले.

Leave a Comment