हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता आहे.
आज शुक्रवारपासून पुढील दोन दिवसांपर्यंत आभाळ स्वच्छ राहणार आहे आणि कमाल तापमान 30 डिग्री सेल्सियच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
राज्यभरात पुढील दोन दिवसांपर्यंत वातावरण थंड राहण्याची अपेक्षा आहे. पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळातील तापमान 10 डिग्रीच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
