अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच शिवाजीराव कर्डिले यांची मोठी घोषणा

अहमदनगर जिल्हा बँकेवर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दोन वेळेस चेअरमनपदाची संधी मिळाली. मधल्या काळात मी चेअरमन नव्हतो.

केवळ संचालक असूनही सर्वांची कामे करीत होतो. त्यामुळेच मला पुन्हा चेअरमन होण्याची संधी मिळाली, असे मत अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष शिवाजी कर्डिले(Shivaji Kardile) यांनी व्यक्त केले. लवकरच जिल्हा बँकेत सातशे कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बँकेच्या अध्यपदाची नुकतीच निवड झाली. कर्डिले यांनी अवघ्या एका मताने राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला.

महाविकास आघाडीची पाच मते फुटल्याने ही निवडणूक राज्यभर गाजली. अध्यक्ष पदाचा पदभार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Leave a Comment