अहमदनगर : भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालयात अल्पसंख्यांक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची स्नेहसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब बेग यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री शिवाजी कर्डिले व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप अल्पसंख्यांक मोर्चाची दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीत भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर करुन, उपस्थित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
जाहीर करण्यात आलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष- जावेद इनामदार (श्रीगोंदा), जमीर अत्तार (पाथर्डी), मुसाभाई शेख (शेवगाव), शब्बीर इमानदार (पारनेर), रफिक पटेल (नगर), निसार शेख (राहुरी), रशीद तांबोळी (पाथर्डी), सरचिटणीस- समीर पठाण (पाथर्डी), रशीद सय्यद (नगर), शब्बीर शेख (पारनेर), निसार शेख (श्रीगोंदा), जब्बार शेख (राहुरी), कासम शेख (शेवगाव), चिटणीस- अफसर सय्यद (राहुरी), बाबाभाई शेख (नगर),
महिला जिल्हा उपाध्यक्ष- नसीमा शेख (जामखेड), शायरा शेख (श्रीगोंदा), युवक अध्यक्ष- असलम इनामदार (पारनेर), युवक उपाध्यक्ष- समीर शेख (पाथर्डी), सोशल मीडिया प्रमुख- दिलावर पठाण (नगर), कार्यकारणी सदस्य- सनवर खान, इकबाल शेख, अकबर शेख, रफत शेख, मतीन सय्यद (नगर), हबीब शेख (जामखेड).
