पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात १४४ कलम लागू करण्यात आला आहे. शहरात विविध कायदे , नियम तसेच न्यायालयीन आदेश यांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आला आहे.पुणे पोलीस प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरात १४४ कलम लागू केला आहे. शहरात १४४ कलम लागू करत शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच वेळावेळी दिलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात हॉटेल मालक व चालक यांची बैठक झाली.
पुणे पोलीस प्रशासनाकडून शहरातील कायदे, न्यायालयीन आदेशांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून त्याअनुषंगाने सीआरपीसी कलम 144 प्रमाणे सुधारित निर्देश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस प्रशासनाचे आदेश हे ३१ मार्च २०२४ पर्यंत १४४ लागू राहणार आहेत.
