Sanjay Raut : आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असून सध्याच्या सरकारचे काही खरं नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलने होत असताना दुसरीकडे मात्र सरकार व्यस्त आहे. लवकरच भाजपाला (BJP) जोडून गेलेले शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येणार नाही, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
नाशिकमध्ये (Nashik) आज संजय राऊत असून ते मालेगावला जाणार आहेत. येत्या 26 मार्चला मालेगाव (Malegaon) शहरात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची जंगी सभा आहे. या सभेच्या पाहणीसाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी देखील सभा घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मालेगावमध्ये 26 तारखेला सभा होत असून उत्तर महाराष्ट्राची ही सभा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्याचे राजकारण लोकांना ठावूक झाले आहे. लोक वैतागले आहे. सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे. लवकरच हे सरकार पडणार असून शिवसेनेतून बाहेर पडलेला गट पुन्हा शिवसेनेत येणार आहे. मात्र एकनाथ शिंदे वगळता सर्व शिवसेनेत येतील, शिवाय आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार, जागा वाटपावरुन वाद होणार नाही याची खात्री मी देतो. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरु आहे, ज्या मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
