शिंदे – फडणवीस सरकारबाबत मोठी अपडेट

सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) येणारा निकाल (result) हा सरकारविरोधी असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या सुनावणीवरुन हे सरकार कोसळेल अस मत जनमाणसांच झालं आहे, सरकार आठ दिवस राहतं की, 15 दिवस मात्र निर्णय हा लागेलच, त्यामुळे आपल्या सोयीच्या फाईल मंजुर करुन ठेवायच्या, तातडीने फायली मागवायच्या हा उदयोग सध्या सुरु आहे.

त्यामुळेच सरकारमधील मंत्री व्दिधा मनस्थितीत आहेत, अशी टीका आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी केली.

जळगाव शहरातील दीक्षितवाडीतील पुतळा हटविल्याप्रकरणी शनिवारी आमदार खडसे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी ते वार्तालाप करीत होते

Leave a Comment