बिरेवाडीत शिवजयंतीनिमित्त गुरूवारी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे शिवजयंती उत्सवाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय. वार – गुरूवार दि. २८ मार्च रोजी शिवजयंती उत्सव होणार असून भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेच देखील आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी बिरेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. गावातील सर्व युवक एकत्र येत हा ऐतिहासिक उत्सव साजरा करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धेच आयोजन केले जाते. यंदाही ही स्पर्धा होणार असून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अचूक नियोजन केले आहे. तसेच विविध बक्षीस देखील ठेवण्यात आले आहे.

२७ मार्च रोजी रात्री शिवनेरीकडे शिवज्योत आणण्यासाठी गावातील युवक वर्ग प्रस्थान करणार आहे. २८ मार्च रोजी सकाळी साकूर ते बिरेवाडी अशी शिवज्योतीची मिरवणूक होणार आहे. तसेच सायंकाळी भव्य मिरवणूकही होणार आहे. त्यानंतर भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

Leave a Comment