राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके हे थेट संगमनेरमध्ये विखे पाटलांचे राजकीय विरोधक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
संगमनेर शहरातील सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंके यांची भेट झाली आहे. निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांचे आशिर्वाद घेतले आहेत. यानंतर दोघांमध्ये जवळपास दीड तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
