Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लोकसभा निवडणुकीत त्याच खासदारांचा पत्ता कट झालाय.
यावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिंदेंच्या 7 खासदारांची काय गती झाली. उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही, निम्मे खासदार उद्धव ठाकरेंशी संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. शिंदे आणि अजित पवार गटही गोंधळलेले आहेत. भाजपचीही (BJP) दमछाक होत आहे. इंडिया आघाडी भाजपचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
