राज्यात पुढील चार दिवस धोक्याचे…. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.

दरम्यान विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Leave a Comment