बीडमध्ये नव ट्विस्ट, पंकजा मुंडे यांना मोठा धक्का 

बीडच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बीडच्या राजकारणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री मातब्बर नेते सुरेश नवले यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, मात्र दुसरीकडे नवले यांच्या पाठिंब्यामुळे बीडमध्ये महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा जणसंपर्क आहे. त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला आहे. सुरेश नवले यांच्या पाठिंब्यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे मात्र बजरंग सोनवणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment