राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या निवडणुकीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी,’मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी ही घोषणा केलीय.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी, “माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे विनोद तावडे यांनी सांगितले आहे, म्हणून मी निश्चिंत आहे. माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही. मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून ही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही.
मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या, असे त्यांनी म्हटले.
