शेगांवची प्रांजली कंझारकर महाराष्ट्रात पुन्हा झळकणार…

अक्षय तृतीयेच्या शुभपर्वावर मनोमनी हा मराठी चित्रपट सांगली येथुन प्रर्दशित करण्यात आला आहे.हा चित्रपट महाराष्ट्रातील विविध चित्रपट गृहामध्ये पर्दशित होत आहे. या चित्रपटामध्ये शेगांवची प्रांजली कंझारकर ही या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीची भुमिका बजावित अहो.

या चित्रपटामध्ये कलाकार – प्राजंली कंझारकर, रोहित परशुराम (झी मराठी सिरीयल फेम) सुप्रिती शिवळकर, मिलींद जाधव आदी प्रमुख भुमिकेत असणार आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शेगांव येथे वास्तव्यास असलेल्या प्राजंली कंझारकर ची अभिनय हा नक्कीच शेगंावकरांकरीता अभिमानास्पद बाब आहे. शेगांव शहर परिसरात लहानाची मोठी झालेली प्रांजल हिला सुरुवातीपासून सिने क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणासोबतच तिचे ओढ ही सिनेमा जगताकडे होती. तिचा मनोमनी हा चित्रपट दि. 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रर्दशित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे सांगली येथे करण्यात आले आहे.

प्राजंली कंझारकर हीने वेगवेगळ्या चित्रपटामध्ये अभिनयाची भुमिका पार पाडली आहेत. त्यामध्ये बबन, एकदम कडक तसेच डॉली या तेलगु चित्रपटामध्ये ही तिने काम केलेले आहे. शेगांव येथील प्रांजली कंझारकर हिचा हा मनोमनी चित्रपट महाराष्ट्रात प्रर्दशित झाला असल्याने याबद्दल शेगांवकरांना स्वार्थ अभिमान आहे. तिने तिच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये उत्तुंग भरारी घ्यावी अशी मनोकामना शेगांव करांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment