मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृषभ : हितशत्रुंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : शत्रुपिडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
