महत्वाची बातमी! उद्या ‘या’ शहरात बॅंका राहणार बंद

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या (20 मे) पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर देशातील काही शहरातील बँका बंद (Bank Closed) राहणार आहेत. त्यामुळं बँकांचे व्यवहार करणाऱ्यांनी ही यादी तपासून घराच्या बाहेर पडावे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल.

‘या’ शहरांमध्ये बँका राहणार बंद 

उद्या (20 मे) देशभरातील 49 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. त्याआधी आज रविवार असल्याने देशभरातील बँका बंद आहेत. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामुळे 20 मे रोजी मुंबई, लखनौ आणि बेलापूरमध्ये बँका बंद राहणार आहेत. या पाचव्या टप्प्यात ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड, लडाख, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

या राज्यातील काही शहरात मतदान होणार आहे. तेथील बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, नागरिकांनी मोबाईल फोन, एटीएम आणि इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल बँकिंगचे व्यवहार करावेत. मे महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि चार रविवार वगळता बँकांना एकूण नऊ विशेष सुट्ट्या आहेत.

Leave a Comment