महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच….

राज्यातील लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात पार पडली आहे. निकाल ४ तारखेला लागणार आहे. त्याआधीच राज्यातील पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंग होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यातील काही नेते आपल्या आणि अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मोठे बदल पहायला मिळाले. अनेक नेत्यांनी मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम या बड्या नेत्यांनी अनेक वर्षांची कॉंग्रेसची साथ सोडून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं निशाण अनेक नेत्यांनी घेतलं होतं. आता काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यावेळीही पक्षप्रवेशाला उत येण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांनी केलेलं आज केलेल्या विधानांवरून त्याचे संकेत मिळतायेत.

सुनील तटकरे यांनी लवकरच राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग सुरू होणार आहे. काही नेते आपल्या आणि अजित पवारांच्या संपर्कात आहेत. प्रफुल पटेल यांच्याही संपर्कात काही नेते आहे. वेळ आल्यानंतर ती नावं जाहीर करण्यात येतील आणि पक्षात प्रवेश दिला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून हा प्रवेश राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल. असं तटकरे म्हटलं आहे. तटकरे यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून नेमके काय होणार, तो नेता कोण असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडला आहे. चार जूनच्या चर्चा वारंवार होत आहेत. पण विजय आमचाच होणार आहे. येत्या २७ तारखेला राष्ट्रवादीची बैठक गरवारे क्लबमध्ये होणार

Leave a Comment