2 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम ; पण लग्नच होत नव्हत, शेवटी विहिरीत उडी घेतली अन् 

एका प्रेमीयुगुलाचं लग्न सध्या चांगलंच चर्चेत आहे. अनेक तासांच्या चर्चेनंतर पंचायतीने जोडप्याचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी दोघांचा विवाह झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आहे.

शनिवारी म्योरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडडीह गावात राहणारा दीपक (22) आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी डूमरदह येथे आला होता. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. यावर दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेत विहिरीत उडी घेतली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काल रात्री काही कारणावरून राग आलेल्या प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर शेजाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री दीपकवर नाराज होऊन मुलीने विहिरीत उडी मारली होती आणि त्यानंतर मुलानेही उडी मारली.

विहिरीजवळ झोपलेल्या मुलीच्या भावाने दोघांनाही उड्या मारताना पाहिल्यानंतर आरडाओरड केला. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने दोरी आणि शिडीच्या साहाय्याने दोघांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. मुलीलाही काही जखमा झाल्या आहेत.

दीपक आणि मुलीबाबत पंचायत बसली आणि रात्रभर या प्रकरणाची चर्चा सुरू राहिली. पंचायतीने दोघांना प्रश्न विचारले. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर दीपकला विचारण्यात आलं की, तो लग्न करण्यास तयार आहे का? त्याचवेळी मुलीला असंही विचारण्यात आलं की, तिला दीपकशी लग्न करायचं आहे का? या प्रश्नांवर दोघांचेही एकमत झाले. यानंतर पंचायतीने मुलीच्या पालकांशी बोलून याप्रकरणी त्यांचे मत जाणून घेतले. गावातील लोकांनी सर्वांचे मत घेऊन दोघांचं लग्न लावून दिलं.

लग्नाला दोन्हीकडील मुलगा आणि मुलीच्या पालकांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. ते म्हणाले की लग्न केलं आहे आणि आता दोघेही आनंदाने एकत्र राहो, ही आमची एकच इच्छा आहे.

Leave a Comment