काही लोक शिळी चपाती पाहूनच नाकं मुरडतात. त्याऐवजी लोक पराठे, गरमागरम चपाती खातात पण शिळ्या चपातीकडे दुर्लक्ष करतात. पण, शिळी चपाती प्रत्यक्षात एकच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळवून देते.
कसे ते आपण या लेखातून पाहू.
नाश्त्यावरुन तुमचा संपूर्ण दिवस किती उत्साही असेल हे खरं तर ठरतं. काही लोकांना नाश्त्यात पोहे खायला आवडतात तर काही लोक उपमा, पास्ता किंवा इडली सारख्या पदार्थांचा आस्वाद घेतात. तर काही जण फ्रेश फ्रूड्स खातात.
नाश्त्याच्या विविध प्रकारांची आवड असलेल्या व्यक्तींपैकी काही जणांना रोज सकाळी चहातून अथवा नुसती शिळी चपाती खायला आवडते, तर काही लोक शिळी चपाती दिसताच नाश्ता न करणं पसंत करतात. शिळी चपाती खावी की न खावी असाही अनेकांना मुद्दा वाटतो. मात्र या शिळ्या चपातीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात आणि ते कसे हे आपण या लेखातून पाहणार आहोत.
शिळी चपाती खाण्याचे फायदे
कमी ग्लायसेमिक इंडेक्स
जेव्हा चपाती शिळी होते तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लक्षणीयरीत्या कमी होतो. याचे कारण म्हणजे चपातीचे तापमान. चपाती थंड झाल्यावर त्याची कार्बोहायड्रेट रचना बदलते, त्याचा परिणाम असा होतो की साखरेचे रुपांतर होण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे रक्तातील साखर शरीरात हळूहळू बाहेर पडते.
पचनासाठी फायदेशीर
जेव्हा चपाती बनवली जाते तेव्हा ती गरम खाणे हानिकारक असू शकते. मात्र, बहुतांश लोकांना चपाती ही गरमागरम खायला आवडते. पण, जेव्हा चपाती थंड होते, तेव्हा त्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स कमी होऊ लागतात, ज्यामुळे त्याचे पचन सोपे होते. शिळ्या चपातीमध्ये ग्लूटेनचे प्रमाणही कमी असल्याने ते पचते.
फर्मेंटेशन प्रक्रियेचे फायदे
किण्वन अर्थात फर्मेंटेशनबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच. या प्रक्रियेद्वारे दुधापासून दही तयार केले जाते. इडली आणि डोसा या प्रक्रियेद्वारे तयार केले जाते ज्याला सामान्यतः खमीर म्हणतात. असे म्हणता येईल की फर्मेंटेशन प्रक्रियेतून गेल्यावर कोणत्याही अन्नपदार्थाचे पचन सोपे होते.
फर्मेंटेशननंतर कोणतेही अन्न सुपरफूड बनते. हीच प्रक्रिया चपातीच्या बाबतीतही होते. रात्रीच्या चपातीमध्ये किण्वन प्रक्रिया होते आणि ती प्रोबायोटिक बनते. म्हणजेच ते पचनासाठी फायदेशीर ठरते. त्यात अशी संयुगे तयार होतात जी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काही चांगले बॅक्टेरियादेखील वाढतात ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. अशी रोटी पचनासाठी तसेच पोषक तत्वांच्या दृष्टीने फायदेशीर असते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
त्यामुळे शिळी चपाती खाणे हे आरोग्यासाठी अधिक चांगले ठरू शकते. मात्र तुम्ही योग्य प्रमाणात ही चपाती खावी.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
