विजयाचा दावा करणाऱ्या पंजाबराव डखांचे डिपॉझिटच जप्त

लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. मविआच्या लोकसभेच्या 30 जागा निवडूण आल्या आहेत. यातीलच एक महत्वाची जागा म्हणजे परभणी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले आहे.

त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचितचे उमेदवार हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पराभव केलाय. या मतदारसंघात 34 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यामध्ये पंजाबराव डखांसह (Panjabrao Dakh) 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण 34 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या निवडणुकीत परभणीतील मतदारांनी संजय जाधव आणि महादेव जानकर यांचे डिपॉझिट सुरक्षित ठेवले आहे. यामध्ये वंचितकडून ऐन वेळेला उमेदवारी दाखल करणारे हवामान तज्ञ पंजाब डख यांच्यासह तब्बल 31 उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झाले आहे. या निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करणाऱ्या हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांना डिपॉझिट वाचवता येईल एवढं मताधिक्यही घेता आलेलं नाही.

Leave a Comment