लवकरच छगन भुजबळ शरद पवार गटात…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. मात्र सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. यापूर्वी ते नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यासाठी देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी माघार घेतली. यामुळे छगन भुजबळ हे नाराज असून ते घरवापसी करणार अशी चर्चा सुरू झाली. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वृत्त वाहिनीशी बोलतांना मोठा खुलासा केला आहे.

नेमका काय म्हणाले विजय वडेट्टीवार…

‘अजित पवार गटात छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळत ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. राज्यातील सरकार कमिशन खोर सरकार झाले आहे. त्यांनी खरेदीचा सपाटा लावला आहे.’

खुलासा करताना ते पुढे म्हणाले,’छगन भुजबळ साहेबांची अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. ते खासगीरित्या बोलले होते. आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे करण्यात काहीच अर्थ नाही. आता एक तुकडा दोन घाव त्यांनी करावे. त्यांच्याकडून आम्हाला ती अपेक्षा आहे. अंगावर आले म्हणून शिंगावर घेणार व्यक्ती ते आहे. परंतु आता कुरकुर करतात. ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही.’

Leave a Comment