मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या (Legislative Council Election) रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीवरुन रणकंदन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. तर, सभापती पद रिक्त आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.
सभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिली आहे.
