मोठी बातमी! दूध दरात मोठी वाढ

सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. महागाई वाढल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. अशातच गायीच्या दुधात वाढ करण्यात आली आहे. गोकुळच्या गायीच्या दुधात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दूधासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

याआधी गोकुळचे गायीचे दूध ५४ रुपये प्रति लिटर मिळत होते. हे दूध आता ५६ रुपये झाले आहे. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या व्यापारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपासून गोकूळची दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात ४० हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment