सध्या महायुतीत बरीच गडबड सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज केला. कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली, महाराष्ट्र जाती-जातीत भेद झाला नाही पाहिजे यासाठीच भेटले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. मात्र आता महायुतीत बरीच गडबड आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत.
त्यामुळे भुजबळ नेमके कशासाठी भेटले याचं कारण दुसरही असू शकतं. महाविकास आघाडी बद्दल चांगलं वातावरण आहे. हे सरकार ज्या पद्धतीने बनले तेच लोकांना मान्य नाही. सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली, हे जनतेला बिलकुल मान्य नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद विधानसभेला मिळेल. सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. जाती जातीत वाद होऊ नये.
