आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करायवास हरकत नाही. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

 

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. गुरूकृपा लाभेल.

 

तुळ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Comment