राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. आमदार अपात्रतेबद्दलची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला होता. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायलयाने या महिन्यात दोन्ही प्रकरणी सुनावणी होणार नाही, असे आदेश दिले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यातच पुन्हा नव्याने याप्रकरणाची सुनावणी पार पडेल, असे सांगितले आहे.
