जळगाव येथील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची धुळे येथे भूसंपादन विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी आता मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आले आहे.असे आदेश मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी काढले आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची दोन दिवसांपुर्वी धुळे येथील भुसंपादन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्तीचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. विनय गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा चांगला परिचित आहे.
