डिग्रस येथील थोरात विद्यालयात तिरंगा रॅलीने वेधले लक्ष

संगमनेर (DSNews24) तालुक्यातील डिग्रस येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिरंगा रॅलीचे विद्यालय ते डिग्रस गाव पर्यंत सायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि लेजिमच्या तालावर तिरंगा रॅली उत्साहात पार पडली.

तसेच लेझीमाच्या तालावर तिरंगा रॅलीचे संचालन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लेझीम प्रात्यक्षिक दाखवत पालकांची व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले . यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Leave a Comment