आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

 

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

कर्क : आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

 

तुळ : रखडलेली कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कुंभ : गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

 

मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment