संगमनेर (DSNews24/किरण पुरी) देशभरात स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना विद्या प्रबोधिनी प्रशालेत विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या जामनगर येथे भारतीय सैन्यात सेवेत असणारे मेजर किरण गुंड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर यांच्या संकल्पनेतून झेंडावंदन हे सैनिकाच्या हस्ते व्हावे म्हणून किरण गुंड यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विद्यालयामार्फत सीमेवरील सैनिकांना मेजर किरण गुंड यांच्या करवी राख्या पाठवण्यात आल्या.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी, सिंथेसायझर, हार्मोनियम, काँगो अशी वाद्य वाजवत देशभक्तीपर गीते गायले. सर्व उपस्थित त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
