महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट, ‘हे’ होणार मुख्यमंत्री 

आगामी काळात महायुतीला बहुमत मिळाले तर कोण मुख्यमंत्री होणार यावर अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, महायुतीचे सर्व आमदार एकत्र येतील आणि सर्व आमदार मिळवून ठरवतील की कोणाला मुख्यमंत्री करायचे. महायुतीचे आमदार मुख्यमंत्र्यांची निवड करतील हे महायुतीत ठरले असल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार या चर्चांना अजित पवारांनी एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे. महायुतीचे सर्व आमदार एकत्र येऊन आगामी मुख्यमंत्री कोण हे ठरवणार असल्याचे अजित पवार म्हणाले. याचाच अर्थ ज्यांचे सर्वाधिक आमदार असणार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, हाच फॉर्म्यूला महायुतीत ठरला आहे का, याची आता चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment