रमेश फिरोदिया महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानासह स्वांतत्र्यदिन उत्साहात साजरा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळेस अहमदनगर जिल्हा बँकेचे मा.चेअरमन बाजीराव पा. खेमनर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपकजी फिरोदिया, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हेमलता राठोड, उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, सुभाष पा.खेमनर उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा प्रतिज्ञा देण्यात आली.रॅली महाविद्यालयातून बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिर या मार्गे काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, जय जवान जय किसान अशा देशभक्तीपर घोषणा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी तिरंगा समोर धरून सेल्फी काढून अभियान उत्साहात साजरे केले. तसेच ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर यांनी सर्व विद्यार्थ्यांना 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या तिरंगा रॅलीमध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर, प्रा.रंजीत गिरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साळुंके, प्रा.पोपट खेमनर प्रा.दत्तात्रय आसवले, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा.योगेश साळुंके, प्रा.संदीप खेमनर, प्रा. लक्ष्मण कातोरे, प्रा. शंकर राशिनकर, प्रा.कल्पना शेळके, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा. शबाना शेख, प्रा.जया राशीनकर, प्रा.स्वाती सागर, प्रा.स्वाती ढोकरे, प्रा. आरजू शेख, प्रा.वृषाली डोखे, प्रा.प्रियंका हाके, प्रा.शेख मॅडम, श्री.मनोहर दूरगुडे, श्री.महेश पोखरकर, श्री.पुंजाहरी वारे, श्री.लक्ष्मण जाधव, श्री.भाऊसाहेब बहिरट यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment