नेपाळमध्ये 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बस नदीत कोसळ्याचे सांगिते जात आहे. तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत ही बस कोसळल्याचे सांगितले जात असून, यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात होती.
या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यूपी एफटी 7623 पासिंग नंबर प्लेट असलेली बस पोखराहून काठमंडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत कोसळली. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अपघातग्रस्तांना नदीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
