मुंबई(DSNews24/किरण पुरी)विधान भवनामध्ये दशनाम गोसावी समाजाबद्दल प्रश्न मांडणारे व श्री क्षेत्र शेगाव येथे गोसावी समाजाला एक एकर जागा मिळवून देण्यासाठी मदत करणारे आमदार संजय भाऊ कुटे यांचा दशनाम गोसावी समाधी बचाव समिती तर्फे जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आलं आहे.
श्री क्षेत्र शेगाव येथील गांधी चौक प्राचीन हनुमान मंदिरात वार शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याचा कार्यक्रम होणार आहे.
या जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गिरी हे असणार आहे. तसेच दासगिरी महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, पुरुषोत्तम शेगोकर यांचाही जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
दशनाम गोसावी समाजाला वेळोवेळी मदत करणारे समाज भूषण अधिकारी पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी, पोलिस उपनिरीक्षक दिलीप भारती, पशूधन पर्यवेक्षक सहदेव पुरी, ॲड. विकास गिरी यांचाही यावेळी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गिरी, विदर्भ प्रदेशाध्यक्ष गजानन गिरी, प्रदेश सरचिटणीस संतोष भारती युवा अध्यक्ष वाल्मिक गिरी, युवा उपाध्यक्ष राजेश पुरी यांनी केले आहे.
