भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपासह इतर पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कल्याणमधील भाजपाचे महासचिव व संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या उपस्थितीत रविवारी टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नाना पटोले यांनी राजाभाऊ पातकर व कार्यकर्त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन कल्याणच्या घराघरात काँग्रेसचा विचार पोहचवा असे सांगितले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ब्रिजकिशोर दत्त, कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सचिव श्रीकृष्ण सांगळे, यशवंत हाप्पे आदी उपस्थित होते.

Leave a Comment