काॅग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्धिकींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्या आली आहे. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
जितेश अंतारपूरकर आणि झिशान सिद्दीकी हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. या कारवाईनंतर अंतारपूरकर हे भाजपमध्ये तर, झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. त्यानंतर जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता काँग्रसकडून अंतारपूरकर यांची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
