बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसला आहे. मलायका हिच्या वडिलांनी, अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून अनिल यांनी आयुष्य संपवलं.
आलमेडा पार्क या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, त्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणास्तव केली, गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आहेत का ज्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
वडिलांच्या आत्महत्येची बातमी कळली तेव्हा ती पुण्यात होती. तेथून ती लागलीच मुंबईच्या दिशेने रवाना झाली अशी माहिती समोर आली आहे.
