अरविंद केजरीवाल CM पदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारे म्हणाले 

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जंगी स्वागत केले. यातच आगामी दोन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल केली. यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या घडामोडींवर भाष्य केले आहे. 

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. प्रकरणाशी संबंधित कोणतीही सार्वजनिक चर्चा करणार नाही. तपासात अडथळा आणण्याचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करतील, अशा काही प्रमुख अटींसह सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या घोषणेनंतर भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अरविंद केजरीवाल यांचे राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेले शहाणपण असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांना आपण सुरुवातीपासून समाजसेवा करा. आपण खूप पुढे जाल असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही आणि शेवटी त्यांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता त्यांना याची जाणीव झाल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. ते एबीपीशी बोलत होते.

Leave a Comment