आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय उलथापालथ होताना दिसेल. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपावरून खटके उडू शकतात. त्यामुळे नाराज असलेले ताकदीचे उमेदवार गट बदलण्याची दाट शक्यता आहे.
मविआकडून महायुतीला सत्तेतून बाहेर करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली जात आहे. तर महायुती आपले सरकार आणण्यासाठी तयारी करत आहे. अशातच भाजप नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटासह उबाठा गटाला मोठा धक्का दिला आहे. फडणवीसांनी फिरवलेल्या जादुच्या कांडीमुळे एकाच मतदारसंघातील मविआच्या दोन्ही पक्षांना झटका बसलाय.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे आणि मविआचे पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात प्रवेश पार पडला.
