दिंडोरी – तालुक्यातील कसबे वणी येथील तलाठी शांताराम पोपट गांगूर्डे १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. विकत घेतलेल्या शेतजमीन आकारा बाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत.
त्या दुरुस्त करण्यासाठी मला पैसे दिले तर मी तुम्हाला त्या दुरुस्ती करून फेरफार नोंदी देवु शकतो असे सांगून आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना आलोसे यांना लाच द्यावयाची नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक २५/०९/२०२४ रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान १० हजार रुपये लाचेची शासकीय पंचां समक्ष मागणी करून सदरची लाच रक्कम आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी आलोसे यांनी त्यांचे कार्यालयात शासकीय पंच साक्षीदार यांचे समक्ष १० हजार रुपयाची लाच स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले असून, तलाठी यांचे विरूध्द वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
