पुणे ब्रेकिंग! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू 

पुण्यातून महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेलिकॉप्टर अपघातात तिघांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आणि खाली पडल्यानंतर त्याला आग लागली. या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ हेलिपॅडपासून दीड किलोमिटरच्या अंतरावर कोसळल्याचे समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment