दुर्दैवी घटना! मीटिंग सुरू असताना महावितरणच्या अभियंत्याचा मृत्यू, वाचा नेमकं काय घडलय..

हिंगोलीमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. महावितरण कार्यालयामध्ये सहाय्यक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग सुरू असताना सहाय्यक अभियंत्याला हृदयविकाराचा झटका आला. या अभियंत्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोळपे असं मयत सहाय्यक अभियंत्याचं नाव आहे. हिंगोली महावितरण कार्यालयामध्ये महावितरणची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी बैठक सुरू होती. सचिन दत्तात्रेय कोळपे हे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. ते मूळचे नांदेडचे रहिवासी आहेत. मीटिंग सुरू असताना अचानक खुर्चीवरून पडले.

सचिन कोळपे अचानक खूर्चीवरून खाली कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी सचिन कोळपे यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत असल्याचं सांगितलं. तोपर्यंत कोळपे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे रुग्णालयात दाखल झाले. सचिन कोळपे यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला

Leave a Comment