संगमनेर विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. संगमनेर तालुक्यातील कोळेवाडी येथे आदिवासी मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आ. थोरातांनी भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रतिक्रिया दिली.
डॉ.सुजय यांच्याऐवजी त्यांचे पिताश्री विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच येऊन थेट निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान दिले.
