अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू होती. दोन दिवसांपूर्वी अजित पवार शिरुरमधून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या.
परंतु आता यातील सस्पेंस संपला आहे. अखेर अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढणार असल्याचे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे.
अजित पवार हे सातवेळा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपण बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिले होते. आता बारामतीतून लढण्याची इच्छा नाही असं अजित पवार यांनी स्वत: जाहीर केलं होतं.
दरम्यान दोन दिवसापूर्वी अजित पवार शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे अजित पवार नेमकं कोणत्या मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली होती. अखेर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचे जाहीर केले. आमच्या पक्षाची पहिली उमेदवारी मी जाहीर करत असल्याचेही ते म्हणाले.
