राहुरी : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तांदुळनेर ग्रामपंचायतीच्या सरपंच गंगुबाई सुनील मुसमाडे तर उप सरपंचपदी त्यांचे जावई संदीप भगवंत साबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवड बैठकीसाठी निवडणूक अधिकारी योगेश भालेकर उपस्थित होते. सरपंच गंगुबाई मुसमाडे यांच्या नावाची सूचना राहुल निमसे यांनी तर उप सरपंच संदीप साबळे यांच्या नावाची सूचना नबाबाई भाऊसाहेब बेलकर यांनी मांडली.साधना शिंगोटे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे, बाळासाहेब शिंगोटे, स्वाती साबळे, मुक्ता खाटेकर, हनुमंत बेलकर, बाबुराव सरोदे, भाऊसाहेब बेलकर, भाऊसाहेब निमसे, भारत साबळे, गोविंद साबळे, लक्ष्मण निमसे, सकाहरी कुमकर, बापू सांगळे, अण्णा खेडेकर, शरद आरोटे, संदीप आरोटे, अनिल सरोदे, रघुनाथ मुसमाडे, ज्ञानदेव कुमकर, भारत शिंगोटे, संतोष साबळे आदी उपस्थित होते
