विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जबरदस्त अॅक्टिव्ह झाले असून महायुतीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, त्यानंतर रामराजे निंबाळकर यांना शरद पवार गटात घेतल्यानंतर आता पुण्यात भाजपला सुरू लावणार आहेत.
शरद पवार पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का देणार आहेत. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह २० नगरसेवकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेणार आहेत. या पक्ष प्रवेशाबाबत स्वत: संजय काकडे यांनी यांनी माहिती दिलीय.
संजय काकडे हे दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत. मागील काही दिवसांपासून संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दरम्यान संजय काकडे हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते सुरुवातीला अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २०१९ आणि २०२४ मध्ये पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नव्हती.
