शिंदे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ वाहनांना संपूर्ण टोल माफी

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यामध्ये जोरदार वाहू लागले आहेत अशातच महायुती सरकार आता मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. ‘लाडकी बहीण योजना’ असेल किंवा विविध प्रकल्पांचा उद्घाटन असेल महायुती सरकार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसोशीन प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच एक मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर टोल माफीचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आला.

राज्यामध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू होऊ शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा झाली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये प्रवेशाचे जे टोलनाके आहेत त्यामध्ये आनंदनगर टोलनाका, दहिसर टोल नाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोल नाका आणि एरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांचा समावेश करण्यात आला असून या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

Leave a Comment