ब्रेकिंग! शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले मोठे निर्णय

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision) आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची (Election) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शिंद सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे.

 

मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 19 निर्णय 

1.मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 पासून अंमलबजावणी

 

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

 

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

 

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

 

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

 

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

 

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

 

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

 

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

 

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार

 

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

 

12.लकिल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

 

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

 

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

 

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

 

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

 

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

 

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

Leave a Comment