कॉलेजवरुन दुचाकीने घरी परतत असतांना मळीच्या टँकरने जोराची धडक दिल्याने विद्यार्थी रस्त्यावर पडला. टँकरचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू(Death) झाला. ही घटना कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर शिवारात बुधवारी दुपारी घडली.
अनिकेत संजय गडगे (वय 17, रा. वडगावपान, ता. संगमनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अनिकेत हा श्रमिक ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता.
बुधवारी कॉलेजमधून दुचाकीने घरी परतत असतांना समनापूर गावाजवळ टँकर क्रमांक एमएच 12 डी 7222 या टँकरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
